पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्टीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वे शरद पवारही उपस्थित होते. राष्ट्रवादीत मोठी फूट पडल्यानंतर शरद पवार, पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर दिसले. त्यावेळी पवारांनी मोदींना हसत केलेलं हस्तांदोलन, मोदींनी अजित पवारांना हातावर दिलेली थाप अनेक चर्चांना तोंड फोडणारी आहे.