उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे हा गुन्हा आहे अशा आशयाची प्रतिक्रिया दिली होती. यावर बोलताना वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबडेकर म्हणाले की, “औरंगजेब इथला राजा होऊन गेला. औरंजेबाचे स्टेटस ठेवणे, कबरीवर फुले वाहने हा गुन्हा नाही.औरंगजेबाने संभाजी राजांना हाल हाल करून मारलं हे आम्हला मान्य नाही.संभाजी राजांना कोणी मारलं हे आम्ही सांगितलेले आहे. पण तुम्ही ते दाखवत नाही”