राहुल गांधी आज संसदेत मणिपूरच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. “यांनी मणिपूरमध्ये हिंदुस्थानची हत्या केली आहे. यांच्या राजकारणानं मणिपूरला नाही, हिंदुस्थानला मणिपूरमध्ये मारलं, अशा शब्दांत त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल चढवला. दरम्यान विरोधकांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणल्यानंतर संसदेत त्यावर चर्चा सुरू आहे.