पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आशिष बंगिनवार यांनी व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देतो त्या करीता १६ लाख रुपयांच्या लाचेची मागणी एका विद्यार्थ्याच्या पालकांकडे केली होती. त्यापैकी १० लाख रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने आशिष बंगिनवार यांना काल रंगेहाथ पकडले होते.त्या घटनेवर आज स्थानिक आमदार रवींद्र धंगेकर हे माजी आमदार मोहन जोशी यांच्यासह प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आले. त्यावेळी अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत होते, हे पाहून आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी आशिष बंगिनवार यांच्या ऑफिस बाहेरील नावाच्या फलकावर शाई फेकून निषेध नोंदवित घोषणाबाजी केली.