राहुल गांधींनी संसदेत अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेत सहभाग घेत पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल चढवला. आपलं भाषण संपल्यानंतर राहुल गांधींनी सभागृहातून बाहेर पडताना केलेल्या एका कृतीवर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आक्षेप घेत संताप व्यक्त केला. महिला खासदारांना फ्लाइंग किस दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी राहुल गांधींवर केला आहे.