ठाण्यात अजित पवार गटाच्या नव्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन बुधवारी (९ ऑगस्ट) पार पडलं. उपमुख्यमंत्री अजित पवार देखील यावेळी उपस्ठित होते. त्यानंतर अजित पवारांनी पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला. नवीन पक्ष, नवीन पक्ष कार्यालयाबद्दल पत्रकारांच्या प्रश्नावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.