महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी समग्र लिखाण करणारे ज्येष्ठ विचारवंत, संशोधक आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे बुधवारी (९ ऑगस्ट) मुंबईत हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले. हरी नरके यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील अनेकांनी उपस्थिती लावली होती. यावेळी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे हरी नरके यांना अखरेचा निरोप देताना भावुक झाल्या होत्या.