मागील काही दिवसांपूर्वी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक, अध्यक्ष संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. यावरून राज्यातील राजकारण तापलं असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहेत. त्याच दरम्यान पुण्यातील डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये संभाजी भिडे यांच्याविरोधात महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधींनी तक्रार दाखल केली आहे. त्यावेळी त्यांच्याबरोबर अॅड असीम सरोदे हे देखील उपस्थित होते.