शरद पवार व अजित पवारांनी एका व्यावसायिकाच्या घरी एकमेकांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. या भेटीमुळे संभ्रमाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहाता शरद पवारांनी स्पष्टीकरण देताना “अजित पवार माझे पुतणे आहेत. त्यांनी भेट घ्यायला काय हरकत आहे”, अशा आशयाचं विधान केलं. त्यापाठोपाठ रोहित पवारांनीही राजकारणात नातीगोती सांभाळण्यासंदर्भात केलेलं विधान चर्चेचा विषय ठरलं. या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी थेट शरद पवारांनाच लक्ष्य केलं आहे.