अजित पवार आणि शरद पवार यांच्या गुप्त भेटीवरून राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना सूचक प्रतिक्रिया दिली आहे. “माझं ऐकत नाही तुम्ही. मी सांगितलं होतं ना तेव्हा? हे त्यांचंच स्वत:चं आहे”, असं म्हणत राज ठाकरेंनी आपल्या जुन्या ट्वीटची आठवण करून दिली.