महाराष्ट्रात विधानसभा व लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. एकीकडे भाजपा, शिंदे गट व अजित पवार गट या तीन मित्रगटांच्या आघाडीकडून नेतेमंडळी ४५ हून अधिक जागा जिंकण्याचा दावा करत आहेत. दुसरीकडे ठाकरे गट, काँग्रेस व शरद पवार गट यांनीही सत्ताधाऱ्यांना पराभूत करण्यासाठी कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील इतर पक्ष, विशेषत: राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. यासंदर्भात आता खुद्द राज ठाकरेंनी सूचक वक्तव्य केलं आहे.