भारत आज आपल्या स्वातंत्र्याचा ७७वा वर्धापन दिन साजरा करत आहे. यानिमित्ताने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, “अमृत काळातील स्वातंत्र्य दिनाच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा. आपला तिरंगा चंद्र सूर्य असेपर्यंत सन्मानाने डौलाने फडकत राहील. या स्वातंत्र्यदिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ५०० विशेष अतिथींना आमंत्रित केलं आहे. देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करताना समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.