मध्यंतरीच्या काळात शरद पवार-अजित पवार भेट हा राजकारणात चर्चेचा मुद्दा ठरत होता. यानंतर शरद पवार गटाला भाजपाकडून ऑफर असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना आमदार रोहित पवार म्हणाले की, “एखादी बातमी आली, म्हणून ती खरी होत नाही आणि राहिला प्रश्न बातमीतल्या आशयाचा तर पवारसाहेबांना लोकांनी ऑफर दिली तरीसुद्धा पवारसाहेब लोकांमध्येच राहत आहे. पवारसाहेबांनी महाराष्ट्र धर्म स्वीकारल आहे, संघर्ष स्वीकारला आहे. भाजपाच्या विचारासोबत ते जात नाहीये आणि त्यामुळे ते लोकांसाठी काम करणार हे स्पष्ट होतंय”