राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून गेलेले नेते शरद पवार यांचा फोटो बॅनरवर वापरत आहेत. आपला फोटो वापरू नये असा इशारा शरद पवारांनी या आधीही दिला होता. मात्र, तरी देखील अजित पवार गटाकडून शरद पवारांच्या फोटोचा वापर केला जात आहे. फोटो वापरावरून खासदार संजय राऊत यांनी अजित पवार गटासह शिंदे गटालाही लक्ष्य केलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी फुटीरांना असाचा इशारा दिला होता, याची आठवणही संजय राऊतांनी करून दिली.