मध्यंतरी झालेल्या अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीबद्दल बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “एका कुटुंबातील दोन लोक भेटले तर त्याला राजकीय समजू नये. मात्र, एक काळ असा येईल की मोदींच्या नेतृत्वात भारत समोर जातो आहे. हे पाहून शरद पवार एकदिवशी मोदींचे नेतृत्व मान्य करतील. आज जरी शरद पवार मोदीजींच्या नेतृत्वाला मान्यता देत नसले तरी काळ बदलतो आणि पवार एक ना एक दिवस विचार करतील की मोदींच्याच नेतृत्वात देश पुढे जाऊ शकतो. त्यामुळे शरद पवारांमध्ये परिवर्तन झालेलं आपल्याला पाहायला मिळेल”