Raj Thackeray In Pune: राज्यातल्या विविध शहरांमध्ये पडलेल्या खड्ड्यांवरुन राज ठाकरेंनी आज पुन्हा एकदा सरकारवर टीका केली. राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. अशात राज ठाकरेंनी काही वेळापूर्वीच पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मतदार जोपर्यंत आपला राग मतपेटीतून व्यक्त करत नाही तोपर्यंत ही परिस्थिती बदलणार नाही असं म्हटलं आहे.