मुंबई महाविद्यापीठाच्या सिनेट निवडणूक स्थगितीवरून सुषमा अंधारेंनी भाजपा, शिंदे गटावर निशाणा साधला आहे. अजित पवारांच्या एन्ट्रीमुळे भाजपा आणि शिंदे गटात धुसफुस वाढल्याचा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान, अजित पवारांमुळे शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात आल्याची चर्चा वारंवार होत आहे. त्यात विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या प्रतिक्रियांमुळे अधिक चर्चा रंगली आहे.