देवेंद्र फडणवीस हे ‘मुख्य’चे ‘उप’ झाल्यापासून अस्वस्थ आहेत, अशी टीका सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून करण्यात आली. त्यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आक्रमक झाले असून ‘सामना’वर कारवाईचे संकेतही दिले आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी आपण देवेंद्र फडणवीसांवर टीका केली नाही, असं स्पष्टीकरण दिलं आहे. चंद्रशेखर बावनकुळेंना एवढ्या मिरच्या झोंबायचं कारण काय? अजून त्यांना खरी मिरची झोंबायची आहे, असा टोलाही राऊतांना लगावला.