आज (२१ ऑगस्ट) तलाठी परीक्षेवेळी सर्व्हर डाऊन झाल्याने परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांचा एकच गोंधळ उडाला. सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थ्यांवर ताटकळत बसण्याची वेळ आली आहे. त्यामुळे परीक्षार्थींनी संताप व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी झालेल्या प्रकारवरून सरकारला धारेवर धरलं आहे.