शरद पवार यांच्या एकट्याच्या बळावर महाराष्ट्रातल्या जनतेने एकदाही राष्ट्रवादीला पूर्ण बहुमत दिलं नाही. शरद पवार पूर्ण बहुमतावर एकदाही मुख्यमंत्री झाले नाहीत, असं विधान सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं होतं. त्यावरून पवार गटाचे राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आपल्या विधानावरून वाद निर्माण झाल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी आता दिलगिरी व्यक्त केली आहे. यासंदर्भात आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.