राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. अजित पवारांसह आमदारांचा एक गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाला आहे. पक्षातील या फुटीला देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत का? असा प्रश्न पत्रकारांनी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांना विचारला. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, १०५ आमदार निवडून आनल्यानंतर डिमोशन द्यायचं. मी त्यांच्या जागी असते तर मला फार वाईट वाटलं असतं, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी फडणवीसांची बाजू घेत भाजपालाच टोला लगावला आहे.