बुधवारी (२३ ऑगस्ट) चांद्रयान ३चं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिंग झालं आहे. एकूण १४ दिवसांची ही मोहीम असणार आहे. प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडरचं काम चंद्राच्या पृष्ठभागावर १४ दिवस सुरू राहिल. त्यानंतर मात्र, नेमकं काय होईल, चांद्रयान ३ पृथ्वीवर परतणार का? या सगळ्याची माहिती जाणून घेऊया.