मोदी सरकारविरोधात मोट बांधलेल्या देशातील २८ विरोधी पक्षांनी एकत्र येत ‘इंडिया’ आघाडीची स्थापना केली आहे. पाटना, बंगळुरूनंतर आता ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला मुंबईत इंडियाची बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी शेतकरी पक्षही या बैठकीत सामील होणार का? असं प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राजू शेट्टी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.