‘इंडिया’ या विरोधकांच्या पक्षांची बैठक काल आणि आज म्हणजेच गुरुवारी (३१ऑगस्ट) आणि शुक्रवारी (१ सप्टेंबर)ला पार पडते आहे. या बैठकीसाठी २८ पक्ष एकत्र आले आहेत. अशात या बैठकीवर आणि जमलेल्या सगळ्या पक्षांवर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. “केवळ मोदीजी हटाव एवढा एकमेव अजेंडा घेऊन ते पक्ष एकत्र आले आहेत. मात्र अशा प्रकारचा अजेंडा कुणी कितीही आणला तरीही लोकांच्या मनात जोपर्यंत मोदीजी आहेत तोपर्यंत ३६ काय १०० पक्ष एकत्र आले तरीही लोकांच्या मनातून ते मोदींना काढू शकत नाहीत असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.