‘पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे लोकसभा निवडणुक लढवणार’ अशा आशयाच्या बातम्या काही दिवसांपासून कानावर येत असतानाच त्यावर भाजपाचे माजी खासदार संजय काकडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काकडे म्हणाले की, “पंतप्रधान मोदी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार हे अधिकृतरित्या जाहीर झालेलं नसलं तरी आमची इच्छा आहे की त्यांनी पुण्यातून निवडणूक लढवावी” याचसोबत संजय काकडे यांनी यासंदर्भात मोदींना निवेदनसुद्धा पाठवले आहे.