जालन्यातील अंतरवाली सराटी येथे शुक्रवारी (२ सप्टेंबर) मराठा आक्रोश मोर्चातील आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामध्ये मराठा मोर्चाचे समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह अनेकजण जखमी झाले आहेत. या लाठीचार्जचे पडसाद आता ठिकठिकाणी उमटायला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी जाळपोळ तर बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आहे.