जालन्यातील लाठीचार्ज प्रकरणी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकावर टीकास्त्र डागलं आहे. आपल्या विरुद्ध बोलायला त्यांना वेळ आहे. पण, आंदोलनकर्त्यांना भेटायला त्यांना वेळ नाही. दोन फुल एक हाफमधील एकही नेता भेटण्यास गेला नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते.