जालन्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज ( ४ सप्टेंबर ) सातवा दिवस आहे. रविवारी रात्री सराटी येथील उपोषणस्थळी मंत्री गिरीश महाजन, आमदार नितेश राणे, आमदार मंगेश चव्हाण दाखल झाले. महाजन यांनी उपोषण सोडण्याबाबत मनोज जरांगे-पाटील यांच्याशी चर्चा केली. तसेच, सरकारचा प्रस्ताव घेऊन उपोषणस्थळी आल्याचं म्हटलं. “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तुमच्याशी संवाद साधला आहे. महिनाभरात राज्य सरकार तुमच्या आंदोलनाची दखल घेईल. तुम्ही सरकारला वेळ द्यावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमच्याशी चर्चा करतील,” असं महाजन यांनी म्हटलं.