अमरावतीमधील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात आयोजित नवचेतना महासभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल बोलत होते. यावेळी पटेल म्हणाले की, “विरोधकांनी ‘इंडिया’ नावाने एकजूट दाखवण्याचा प्रयत्न चालवला असला, तरी त्यांच्यात मतैक्य नाही. ‘एनडीए’कडे नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदाचा चेहरा आहे. मात्र विरोधक कुणा एकाचे नावही घेऊ शकत नाहीत. विरोधकांमध्ये हिंमत असेल, तर त्यांनी राहुल गांधी यांचे नाव पंतप्रधानपदासाठी जाहीर करावे, ते तसे करूच शकणार नाहीत. देशातील जनता नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी आहे” असा दावा यांनी रविवारी सायंकाळी येथे बोलताना केला.