मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज जालना दौऱ्यावर आहेत. जालन्यात लाठीचार्जची घटना घडल्यानंतर शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी जालना दौरा केला. त्यानंतर आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आंदोलकांची भेट घेतली. मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी सरकारवर घणाघाती टीका केली. गेंड्याच्या कातडीच्या राजकारण्यांसाठी तुमचा जीव गमावू नका असंही राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांना सांगितलं.