‘लोकसत्ता लोकसंवाद’ या कार्यक्रमात आम आदमी पक्षाचे खासदार व प्रवक्ते राघव चड्ढा यांची विशेष मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी सध्याचे राजकारण, भाजपा, केंद्रसरकारची विविध धोरणं याबद्दल आपली स्पष्ट आणि रोखठोक भूमिका मांडली. यावेळी त्यांनी “भाजपाने राजकारणात विष पेरून राजकीय वातावरण कलुषित केलं. केंद्रातील भाजपाला सर्व राज्यांच्या कारभारावर अंकुश ठेवायचा असून ही भूमिका संघराज्य पद्धतीला मारक आहे” अशी भूमिका व्यक्त केली.