जालन्यात आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीहल्ला केल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद आता उमटू लागले आहेत. राजकीय वर्तुळातून या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं जात आहे. मराठा आरक्षणाची मागणी जोर धरत असतानाच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण ओबीसींच्या हक्कावर गदा न आणता मराठा समाजाला कसा न्याय देता येईल हे बघितलं पाहिजे” असं भुजबळ म्हणाले.