जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनस्थळी आज (५ सप्टेंबर) वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भेट दिली आहे. जालन्यात दडपशाहीचे राजकारण सुरू आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. यावेळी त्यांनी पोलिसांना सुद्धा सल्ला दिला आहे की, तुम्ही सुद्धा माणूस आहात आम्ही सुद्धा माणूस आहोत, त्यामुळे दोघांनीही एकमेकांसोबत माणुसकीने वागले पाहिजे.