भाजपा नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेला ठिकठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याच परिक्रमा यात्रेनिमित्त पंकजा मुंडे या पुणे दौर्यावर आल्या होत्या. त्यावेळी त्यांना जालना येथे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत प्रश्न विचारला असता, त्या म्हणाल्या की, “जालना येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणार्या आंदोलनकर्त्यांवर हल्ला झाला ती अत्यंत दुर्दैवाची गोष्ट होती. त्या घटनेची सखोल आणि निःपक्षपाती चौकशी झाली पाहिजे.आता नुसती आश्वासन नकोत तर पोटातून भावना करून एखाद्याने नेतृत्त्व स्वीकारले पाहिजे. तसेच मराठा समाजाला आरक्षण कसे आणि किती मिळणार हे ठोकताळे सांगणारा चेहरा समोर आला पाहिजे”