जालन्यातील मराठा आंदोलनात झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्यावतीने आज (११ ऑगस्ट) ठाणे बंदची हाक पुकारण्यात आली आहे. त्यामुळे ठाणे शहरात, रेल्वे स्टेशन परिसर, तीन हात नाका तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ठिकाणी कडक बंदोबस्त करण्यात आला आहे.