मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बैठकांवर बैठका होत आहेत. मात्र, अद्यापही त्यावर अंतिम तोडगा निघालेला नाही. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. “दुर्दैवाने सत्तेत असलेल्या निजामी मराठ्यांनी रयतेच्या मराठ्यांचा विचारच केला नाही. माझे जनतेला आवाहन आहे की, तुम्ही जो पर्यंत स्वतःच बघणार नाही, तोपर्यंत न्याय मिळणार नाही’ यावेळी “अकोल्यात निघालेल्या मराठा समाजाच्या मोर्चात मराठा समाजाचे आमदार होते का?” असा सवालही आंबेडकरांनी उपस्थित केला.