मराठा आरक्षणाची मागणी करत जालन्यातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोज जरांगे पाटील गेल्या १५ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, “केंद्र सरकारने संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या विशेष अधिवेशनात त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय घेतला पाहिजे. यासाठी घटनेत तरतूद करावी, तसेच घटनादुरुस्ती केली पाहिजे. आरक्षणाविषयी सर्वसमावेशक असा तोडगा काढणं गरजेचं आहे. एवढचं आमचं म्हणणं आहे”