शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आज (१२ सप्टेंबर) मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार ही तिन्ही मंडळी धुरंधर आहेत. मनोज जरांगेंना जे पाहिजे ते घडवल्याशिवाय थांबणार नाहीत, असं संभाजी भिडे म्हणाले.