मोदी सरकारचा पराभव करण्यासाठी काही समविचारी पक्षांनी एकत्र येत ‘इंडिया’ आघाडीची स्थापना केली. पुढील रणनीतीवर चर्चा करण्यासाठी मु्ंबईत ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला आघाडीची बैठक पार पडली होती. इंडिया आघाडीतील विरोधकांच्या या एकजुटीमुळे २०२४ मध्ये भाजपाचा पराभव होईल, असा विश्वास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी ‘लोकसत्ता’च्या ‘लोकसंवाद’ कार्यक्रमात व्यक्त केला. तसंच एक देश-एक निवडणूक, इंडिया आघाडीची बैठक, मणिपूरमधील हिंसाचार यांसह विविध मुद्द्यांवर त्यांनी संवाद साधला.