ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नात्याबद्दल शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली. दोन्ही नेत्यांमध्ये प्रेमळ कोण आहे? या प्रश्नावर ‘जिथे हेट असतं तिथेच लव असतं आणि कायमच लव राहील’ असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. ‘मतभेद असू शकतात पण तिरस्कार असता कामा नये’ असं म्हणत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे नीलम गोऱ्हे यांनी सल्लाही दिला.