मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं गेल्या १४ दिवसांपासून उपोषण सुरू आहे. त्यापाठोपाठ राज्यभरात मराठा आरक्षणासाठी आंदोलनं केली जात आहेत. काही ठिकाणी आंदोलक आक्रमक पवित्रा घेत आहेत. त्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांचेच कान टोचले आहेत. शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन त्यांनी समाजाला केलं आहे.