गेल्या १७ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू होतं. आज (१४ सप्टेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. जरांगे यांनी गेल्या काही दिवसांपासून पाणी घेणं देखील बंद केलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनधरणी केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. त्यानंतर त्यांना आपली सविस्तर भूमिका मांडली.