ठाणे परिवहन सेवेतील कंत्राटी वाहक कर्मचाऱ्यांनी आज सकाळी तीन वाजल्यापासून काम बंद आंदोलन केले आहे. त्यामुळे परिवहन बस सेवेवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. रोख पगार मिळावा त्याचप्रमाणे इतर मागण्या मान्य व्हाव्या यासाठी अनेक वर्षांचा पाठपुरावा करून देखील आम्हाला तो पगार थेट मिळत नसल्याने आम्ही हे आज आंदोलन करत असल्याचे आंदोलकांनी सांगितले.