Kolhapur Gokul Dudh Sangh: कोल्हापूरमध्ये गोकुळच्या वार्षिक सभेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पोलीस प्रशासन ठराव आणि ओळख पत्राची तपासणी करून अट सोडत होते. मात्र पोलिसांनी काही ठराव धारकांवर आक्षेप घेतल्यानंतर पोलीस आणि गोकुळ संचालक यांच्यात बाचाबाची झाली. पोलीस कोणाच्या सांगण्यावरून ठराव धारकांना रोखत आहेत. जाणून बुजून पोलीस प्रशासन सत्ताधाऱ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला.