अमरावतीच्या खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा आणि काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु आहेत. २०१९ साली लोकसभा निवडणुकीत यशोमती ठाकूर यांनी रवी राणांकडून कडक नोटा घेतल्याचा दावा नवनीत राणांनी केला होता. यावर आता प्रहार संघटनेचे अध्यक्ष, आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘फडणवीसांनी राणा दाम्पत्यावर आवार घालावा’ असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.