धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत, अशी बोचरी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. त्यानंतर आता अजित पवार गटही आक्रमक झाला असून आमदार रोहित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. छोट्या नेत्यांना पुढे करायचं आणि मोठ्या नेत्यांनी वरून तमाशा बघायचा, अशी भाजपाची प्रवृत्ती
असल्याची टीका रोहित पवारांनी केली आहे.