गेल्या दोन दिवसांपासून संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. नव्या संसदेत प्रवेश करताना सदस्यांना राज्यघटनेची नवी प्रत देण्यात आली होती. त्यामध्ये धर्मनिरपेक्ष व समाजवादी हे शब्द नसल्याचा दावा काँग्रसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी केला आहे. या माध्यमातून संविधान बदलण्याचा जाणीवपूर्व प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप चौधरी यांनी मोदी सरकारवर केला आहे.