मंगळवारी (१९ सप्टेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत महिला आरक्षणाचं विधेयक मांडलं. नारी शक्ती वंदन अधिनियम असं या विधेयकाचं नाव आहे. दरम्यान, या विधेयकावर आज लोकसभेत चर्चा झाली. या चर्चेवेळी काँग्रेसच्या रायबरेलीच्या खासदार सोनिया गांधी यांनी महिला आरक्षण विधेयकाबाबत काँग्रेसची भूमिका मांडली. काँग्रेस पक्षाने विधेयकाला समर्थन दिलं आहे. मात्र, त्याचबरोबर चिंता देखील व्यक्त केली आहे.