पुण्यातील कसबा विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे. गणरायची आरती झाल्यानंतर धंगेकरांनी राज्यसरकारवर हल्लाबोल केला. “केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकारचा कारभार जनतेने पाहिला आहे. भाजपा नेत्यांनी राज्यातील मराठा समाज आणि धनगर समाजाला आरक्षण देऊ असे आश्वासन दिले होते, पण त्याच पुढे काहीच झाले नाही. राज्यातील परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने केवळ आश्वासन न देऊन पळ काढू नये, तर आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा” असा इशारा धंगेकर यांनी दिलाय.