शुक्रवारी (२९ सप्टेंबर) पूर्व मध्य अरबी समुद्रावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचं रुपांतर आता तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झालं आहे. हे तीव्र कमी दाबाचं क्षेत्र पणजीपासून ११० किमी तर रत्नागिरीपासून १३० किमी अंतरावर आहे. ते पूर्व ईशान्येकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील ४८ तासांत कोकण, गोव्यात जोरदार पावसाची शक्यता हवामानतज्ज्ञ शिल्पा आपटे यांनी वर्तवली आहे. त्यामुळे पुण्याच्या हवामानावरही परिणाम होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.